विकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी; 'या' वाहनांना महामार्गावर प्रवेश नाही - महामार्ग पोलीस
Published : Dec 24, 2023, 2:25 PM IST
पुणे Mumbai Pune Expressway : नाताळ सणानिमित्त शाळा आणि महाविद्यालये, सरकारी कार्यालये यांना सलग तीन दिवस सुट्ट्या आल्या आहेत. यामुळं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड आणि जड वाहनांनी या तीनही दिवशी दुपारी बारानंतर घाटातून प्रवास करावा, असं आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलंय. सलग सुट्टी आल्यानंतर घाटामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घाट सुरु होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबवण्यात येते आणि वाहतूक कोंडी संपल्यानंतर जड अवजड वाहनं मार्गस्थ करण्यात येतात. मागील वाहतूक कोंडीची परीक्षण केलं असता जड अवजड वाहनं व कार हे सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत एकत्र आल्यानंतर वाहतूक कोंडी होते. यावेळीही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आज व सोमवारी सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत जड व अवजड वाहनांना पुणे वाहिनीवर बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक ( वाहतूक ) डॉ. रविंद्र सिंगल यांनी पत्रकाद्वारे दिलीय.