बोरीवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर जाणाऱ्या मिक्सर ट्रकला भीषण आग; पाहा व्हिडिओ - देवीपाडा मेट्रो स्टेशन
Published : Dec 11, 2023, 8:04 AM IST
मुंबई Mumbai Fire :बोरीवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर रविवारी (10 डिसेंबर) एका चालत्या मिक्सर ट्रकला अचानक आग लागली. आग एवढी भीषण होती की यात ट्रक चालक जखमी झाला. एक्सप्रेस हायवेवरील देवीपाडा मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच कस्तुरबा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून वाहनांच्या अपघातात वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) दाणा मार्केटमध्ये पार्क केलेल्या एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. यावेळी आगीनं काही मिनिटातच रौद्र रूप धारण केलं होतं. यासंदर्भात माहिती मिळताच वाशी अग्निशमन पथक घटनास्थळी आले. त्यावेळी ट्रकची आग विझवण्यासोबतच आग इतरत्र पसरू नये म्हणून सव्वा तास प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.