महाराष्ट्र

maharashtra

सोन्याची तस्करी

ETV Bharat / videos

Gold Smuggling: सोन्याच्या तस्करीच्या आरोपावरून मुंबई विमानतळ कस्टम्सने केली भारतीय नागरिकाला अटक; २.२८ कोटी रुपयांचे केले सोने जप्त - Mumbai Airport Customs

By

Published : May 19, 2023, 11:02 AM IST

मुंबई :दिवसेंदिवस सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. मुंबई विमानतळ कस्टम्सने सोन्याच्या तस्करीच्या आरोपावरून मस्कतहून येणाऱ्या एका भारतीय नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून २.२८ कोटी रुपयांचे ४.२ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. त्या व्यक्तीने आपल्या जीन्स, अंडरगारमेंट्स आणि नी कॅपमध्ये हे सोने चतुराईने लपवले होते. मात्र, मुंबई विमानतळ कस्टमसमोर त्याची हुशारी फसली आणि तो पकडला गेला. मुंबई विमानतळ कस्टमने सोने जप्त केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर आला होता. तत्पूर्वी, अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई विमानतळाच्या सीमा शुल्क विभागाने एप्रिल महिन्यात विदेशी मूळ सिगारेटच्या तस्करीचे 55 गुन्हे नोंदवले.सुमारे ९,३६,७०० सिगारेट जप्त केले. सीमाशुल्क विभागाने जप्त केलेल्या सिगारेटची किंमत ४१ लाख रुपये आहे. मुंबई कस्टम्सने ट्विट केले की, एप्रिल २०२३ मध्ये मुंबई विमानतळ कस्टम्सने विदेशी मूळ सिगारेटच्या तस्करीच्या ५५ प्रकरणांची नोंद केली. ४१ लाख रुपये किमतीच्या सुमारे ९,३६,७०० सिगारेट जप्त केल्या आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details