Ganesh Utsav Celebration: मुकेश अंबानीच्या निवासस्थानी गणेशोत्सव सोहळा, बॉलीवूड दिग्गजांसह राजकीय नेत्यांनीही लावली हजेरी - मुकेश अंबानी
Published : Sep 19, 2023, 11:07 PM IST
मुंबईGanesh Utsav Celebration: मुकेश अंबानींच्या निवासस्थानी गणेशोत्सव सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याला बॉलीवूड दिग्गजांसह राजकीय नेत्यांनीही हजेरी लावल्याचं दिसून आलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. बॉलीवूड कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग गणेश चतुर्थीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानी पोहोचले. जवान चित्रपट दिग्दर्शक ऍटली, अभिनेत्री रेखा हे देखील अँटिलिया' या निवासस्थानी पोहोचले होते. गणेश चतुर्थी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अभिनेता अजय देवगण, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख आणि चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी हेदेखील उपस्थित होते. अभिनेता सलमान खाननेदेखील या सोहळ्याला हजेरी लावली आहे. बाप्पाच्या आगमनानं सगळीकडं आनंदाचं वातावरण आहे. मुकेश अंबानींच्या निवासस्थानी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ( Mukesh Ambani Antilia residence)