मोहरम! नेमकं काय झालं होतं आशुरच्या दिवशी; पाहा व्हिडिओ - मोहरम
पुणे - आज जगभरात अनेक धर्मीयांचा नवीन वर्षाची सुरवात ही जल्लोषात आनंदात होत असते. पण इस्लाम धर्मात नवीन वर्षाची सुरवात ही दुःखाने होती. मोहरम' हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू इमान हुसैन हे करबला येथे आपल्या 72 अनुयायीबरोबर शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव हा महिना शोक म्हणून व्यक्त करतात. मोहरम हा आनंदाचा सण नसून दु:खाचा दिवस आहे. या महिन्यात इमाम हुसैन यांचे बलिदान उजागर केले जाते. शिया मुस्लिम समुदायातील लोक काळे कपडे घालून या बलिदानासाठी जुलूस काढतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST