'आम्ही उद्धव ठाकरेंसोबत'; राजन साळवी यांच्यावरील कारवाईवर वैभव नाईक, विनायक राऊत यांची प्रतिक्रिया - विनायक राऊत यांची प्रतिक्रिया
Published : Jan 18, 2024, 9:22 PM IST
|Updated : Jan 18, 2024, 10:37 PM IST
मुंबई Rajan Salvi ACB Raid : राजन साळवी यांच्यावरील ACB च्या कारवाईनंतर खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. राजकीय दबावाखाली कायदे धाब्यावर बसवून निर्णय घेतले जात असल्याचा आरोपही नाईक यांनी केलाय. आम्ही शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचंही ते यावेळी म्हणाले. राजन साळवी यांच्यावर ACB नं कारवाई केल्यानंतर वैभव नाईक यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
विनायक राऊत यांच्याकडून निषेध : आमदार राजन साळवी यांच्यावर एसीबीनं केलेल्या कारवाईचा खासदार विनायक राऊत यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. 'झुकेगा नही' या बाण्यानं लढणाऱ्या राजन साळवी यांचा अभिमान आहे. शिवसेना ठाकरे गट त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं उभा राहील, असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं.