पैसा आणि सत्तेच्या जोरावर आलेले हे शिंदे सरकार, शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील - खासदार सुप्रिया सुळे - Government Came on Strength of Money
पुणे : आषाढी एकादशीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( NCP MP Supriya Sule ) यांनी पुण्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या शअरी क्षेत्र विठ्ठलवाडी येथे भेट देऊन ( Supriya Sule visited Vitthalwadi ) श्रीविठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी ई-टीव्ही प्रतिनिधीशी बोलताना, शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, आता आलेले शिंदे सरकार ही जनतेसाठी नसून नागरिकांच्या पैशांवर मजा करणारे सरकार आहे. तसेच हे सरकार पैशांच्या जोरावर आलेले सरकार आहे. अशी गंभीर टीका त्यांनी शिंदे सरकारवर केली आहे. शिवसेनेचे खरे वारसदार याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, की बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच यांनी आपला वारसदार निवडला आहे. त्यामुळे आता त्यावर चर्चा करण्यात कोणताही अर्थ नाही. आता जर कोणी स्वतःला शिवसेनेचा वारसदार समजत असेल तर बाळासाहेबांना दुखावले असे होईल. मित्र पक्ष म्हणून शिवसेना सोबत कायम आम्ही कायम आहोत आणि पुढेही सोबत राहणार. हे सरकारच पैशांनी बनलेले ( Government Came on Strength of Money ) आहे. सामान्य जनेतेशी यांनी काही देणेघेणे नाही. राज्यात मध्यवर्ती निवडणुका होऊ शकतात का या प्रश्नावर ते म्हणाले की, राज्यात राजकारणात काहीही होऊ शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST