MP Supriya Sule criticism on PM Narendra Modi : पंतप्रधान नेहमीच महाराष्ट्र विरोधात बोलतात- खासदार सुप्रिया सुळे - पालघर
पालघर - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) हे कोणत्याही एका राज्याचे नसून देशाचे पंतप्रधान आहेत. पण, ते नेहमीच महाराष्ट्र राज्याच्या विरोधात बोलतात हे दुर्देवी असल्याचे मत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे गुरुवारी (दि. 28 एप्रिल) पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. पंतप्रधान कोरोनावर काहीतरी बोलतील, असे वाटत होते. मात्र, तसे न करता त्यांनी सर्व राज्यांवर ढकलून दिले. त्यातच पुन्हा एकदा महाराष्ट्र विरोधात बोलून त्यांनी आमचे मन दुखावले, असे यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST