महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sunil Tatkare On Sharad Pawar : शरद पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य - सुनील तटकरे - leadership of Ajit Pawar

🎬 Watch Now: Feature Video

Sunil Tatkare On Sharad Pawar

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2023, 10:52 PM IST

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)- शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत मी बोललो आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्रितपणे 'एनडीएम'ध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर आम्ही राज्यातील महायुती तसेच एनडीए सरकारमध्ये सहभागी झालो, असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सांगितलं आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाचे नुकतेच आलेले निर्णय पाहून आम्ही राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याच माध्यमातून आम्ही आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. अजित पवार यांच्याबाबत शरद पवार यांनी जे काही सांगितले, ते आम्हाला मान्य आहे, असं देखील तटकरे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधिंशी संवाद साधताना सांगितलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आमचेच नेते असल्याचं सांगितलं होतं. यानंतर शरद पवार यांनी घुमजाव करत मी असे बोललोच नसल्याचे स्पष्टीकरण साताऱ्यात दिलं होतं.  

ABOUT THE AUTHOR

...view details