Maharashtra Political Crisis : 'त्या' आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं, संजय राऊत यांचा इशारा - संजय राऊत
मुंबई - खरी शिवसेना ही आसाममध्ये नाही तर रस्त्यावर आहे, ज्यांनी संघर्ष केला. हा पक्ष उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वाखाली अजूनही मजबूत आहे. चार आमदार गेले, दोन खासदार, दोन नगरसेवक गेले म्हणजे पक्ष संपत नसतो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut on Maharashtra Political Crisis ) यांनी दिली. ते म्हणाले, सर्व सोडून का गेले याची कारणे लवकरच समोर येतील. अजूनही आम्ही या सर्वांच्या संपर्कात आहोत. मुख्यमंत्र्यांनी समोर येण्याचे आवाहन केल्याबाबत विचार असता संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कोण्त्याही आमदारास आवाहन केलेले नाही. गेलेल्या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवाव, असा इशाराही यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST