Barsu Refinery Row : मुस्लिम राष्ट्राच्या रिफायनरीसाठी हिंदुत्ववादी सरकार कोकणातील जनतेवर हल्ला करतंय - संजय राऊत
मुंबई: कोकणातील बारसु रिफायनरीच्या वाद आता चिघळत चालला आहे. शुक्रवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. त्यात पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून महाविकास आघाडीचे नेते सरकारला धारेवर धरत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, मला आश्चर्य वाटते की, काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवाला घेऊन सांगत होते. मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल आहे. बारसुच्या आंदोलकांवर अजिबात लाठीचार्ज झाला नाही. सर्व काही शांतीने सुरू आहे. पण आपण पाहिले असेल बारसुच्या आंदोलकांवर बेदामपणे त्यांच्यावर लाठीमार केला गेला. आता मुख्यमंत्र्यांना अधिकारी खोटी माहिती देतात की, काय असा प्रश्न पुढे येतो. या सर्व प्रकरणावर एक तर मुख्यमंत्री डोळे झाक करत आहेत किंवा मुख्यमंत्र्यांची प्रशासनावरती अजिबात पकड नाही. अधिकारी त्यांना फसवत आहेत. खोटी माहिती देते आहेत. मुख्यमंत्री बोलत आहेत लाटी हल्ला झाला नाही. मी आदेश दिलेला नाही. अशाप्रकारे हा गोंधळ सुरू आहे. प्राण गेला तर चालेल का? आम्ही जमीन सोडणार नाही असे स्थानिक बोलत आहेत. 70 टक्के आमच्या बाजूने आहेत. कसला सर्वे केलाय? लोक इथं मारण्यासाठी रस्त्यावर का उतरले आहेत? हे आधी तपासा. समन्वय कोणाशीच नाही या सरकार मध्ये. तसचे हे हिंदुत्ववादी सरकार एका इस्लामिक रिफायनरीसाठी रत्नागिरीत मराठी माणसांनवर हल्ला करत आहेत.