Prataprao Jadhav criticizes Rahul Gandhi : राहुल गांधींच्या यात्रेची पाकिस्तान, बांगलादेशात गरज - Prataprao Jadhav criticizes Rahul Gandhi
बुलढाणा : राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची भारत जोडो पदयात्रा ( Bharat Jodo Yatra ) ही महाराष्ट्रात दाखल झालेली आहे. या निमित्ताने आता विरोधी पक्षाकडून राहुल गांधींच्या पदयात्रेवर टीका ( Criticism on Rahul Gandhi Bharat Jodo Yatra ) होताना दिसत आहे. यामध्ये शिंदे गटातील बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव ( MP Prataprao Jadhav ) यांनी सुद्धा राहुल गांधी यांना टार्गेट करीत उपरोधक टीका केली. भारत जोडो ही राहुल गांधींची यात्रा बुलढाणा जिल्ह्यात १९ नोव्हेंबर रोजी दाखल होणार आहे. या यात्रे संदर्भात जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उपरोधिक टीका करीत या यात्रेची खरी आवश्यकता ही पाकिस्तान बांगलादेश जम्मू काश्मीर या ठिकाणी आहे. आपल्या भारतात राहुल गांधींनी विखुरलेल्या पक्षाला एकसंघ आणण्यासाठी पक्षांतर्गत यात्रा काढण्याचा टोला त्यांनी लगावला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST