Prataprao Jadhav Allegation : विनायक राऊत पैसे घेऊन निवडणूक तिकीट...; खासदार जाधव यांचा गौप्यस्फोट - पैसे घेऊन निवडणूक तिकिटाचे वाटप
बुलढाणा : बुलढाणा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. आम्ही एकत्र असताना विनायक राऊत हे ज्या मतदानसंघाचे संपर्क प्रमुख राहायचे, त्या ठिकाणावरून शिवसेनेचे तिकीट वाटप वेळी त्या उमेदवाराकडून पैसे घ्यायचे ,असा गौप्यस्फोट खासदार जाधव यांनी केला आहे. त्यामुळे अशा प्रकारामुळे उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांचे अधिकार काढून घेतले होते, असेही खासदार जाधव यांनी सांगतले. मी सिनियर असल्यामुळे माझ्यासोबत पैसे मागण्याचा प्रकार जरी झाला नसला तरी, अनेक उमेदवारांकडून त्यांनी आर्थिक व्यवहार केले असल्याचे खासदार जाधव यांनी सांगितले आहे. खासदार जाधव यांच्या राऊतांवरील आरोपांनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. आता यावर खासदार विनायक राऊत हे काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.