Girish Bapat Death : खासदार गिरीश बापट यांचे निधन, सकाळी तब्येत होती चिंताजनक - Dinanath Hospital
पुणे: खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यांची सकाळी तब्येत चिंताजनक होती. बापट यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार चालू होते. गिरीश बापट यांना श्वसनाच्या आजार असल्यामुळे त्याच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू राहिले. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर डायलिसिस सुरू होते. बापट यांची दोन दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. कसबा पोट निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील सर्वच नेते मंडळींनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेत प्रकृतीची विचारपुस देखील केली होती. शिरीष याडगिकर यांनी म्हटले होते की , खासदार गिरीश बापट पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल असून त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. ते लाईफ सपोर्ट सिस्टिमवर असून डॉक्टरांचा एक पथक त्यांच्यावर नजर ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, त्यांचा मृत्यू झाला आहे.