Video : जाणून घ्या मोहिनी एकादशीचे महत्त्व; व्रत केल्यास अनेक फायदे - मोहिनी अवतार
नाशिक - पुराणात भगवान विष्णूने मोहिनी अवतार याच दिवशी घेतला होता. म्हणून त्यास मोहिनी एकादशी म्हटले जाते. मनुष्याच्या पुनर्जन्माच्या चक्र बंधनातून मोह मायेतून मुक्त करणारी एकदशी म्हणजे मोहिनी एकादशी. यादिवशी व्रत, अनुष्ठान, उपवास आणि विष्णू देवाची विशेष महापुजा केली तर त्यामुळे अनेक व्याधी, आजरापासून मनुष्य मुक्त होतो. तसेच विवाह इच्छुकांच्या विवाह मार्गातील अडथळे दूर होतात. तसेच वैवाहिक जीवनात सुखशांती लाभते. म्हणून या दिवशी सगळ्यांनी विष्णू भगवंताचे व्रत आचारवे आणि या दिवशी मनोभावे पूजा करावी असं महंत अनिकेत शास्त्री महाराज देशपांडे यांनी सांगितले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST