Thane Crime News: ३ मिनिटात केली ३० लाखाच्या मोबाईलची चोरी, पहा घटना सीसीटीव्हीत कैद - कुमार चंदन पवनकुमार झा
ठाणे : जिल्ह्यात एकेकाळी दुकानफोडी करणाऱ्या चादर गँगने धुमाकूळ घातला होता. मध्यरात्रीनंतर मोबाईल विक्रीचे दुकानानाचे शटर फोडून लाखोंचे मोबाईल लंपास केले होते. आता पुन्हा चादर गँग कल्याणात पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे. या गँगमधील चोरट्यांनी कल्याण पश्चिम भागात असलेल्या अहिल्याबाई चौकातील एका मोबाईलच्या दुकानाचे शटर तोडून ३ मिनिटात ३० लाखांचे मोबाईल लंपास केले आहे. ही चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार कुमार चंदन पवनकुमार झा (वय ४०) हे भिवंडी तालुक्यातील कोनगाव राहत आहे. त्यांचे कल्याण पश्चिम भागातील अहिल्याबाई चौकात मोबीवर्ल्ड नावाने मोबाईल विक्रीचे दुकान आहे. या दुकानात २६ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत शिरले, त्यानंतर दुकानातील महागडे तब्बल ३ लाखांचे मोबाईल घेऊन पसार झाले. दरम्यान दुकान मालक कुमार चंदन पवनकुमार झा यांनी नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडल्यानंतर त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले.