सरकार नुसतं तोंड वाजवायलाच’, राज ठाकरे यांचा मराठी पाट्यांवरुन हल्लाबोल - राज ठाकरे
Published : Nov 28, 2023, 5:01 PM IST
पिंपरी चिंचवड : राज्यात दुकानांवर मराठी पाट्या लावणं बंधनकारक असल्याचा निर्णय न्यायालयानं दिला होता. मात्र, तरीदेखील अन्य भाषेतील नावाचे फलक दुकानांवर लावलेले दिसल्यानं मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केलीय. राज्य सरकार केवळ तोंड वाजवायलाच असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. राज्यात बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आहे, असं सांगता मग कारवाई का होत नाही, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. माझा मुंबई पोलिसांवार विश्वास आहे. त्यांना मोकळीक दिली तर, 24 तासात सर्व ठीक होईल, असा दावा ठाकरे यांनी केला आहे. मुंबई शहरातील दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मुदत दिली होती. ही मुदत संपली आहे. त्यानुसार पालिकेनं दंडात्मक कारवाई करण्याची तयारी केली आहे. मात्र, राज ठाकरे यांनी सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केलीय.