ॲमेझॉन कार्यालयात 'या' कारणामुळं मनसे कार्यकर्त्यांचा राडा, पाहा व्हिडिओ - पाकिस्तानचा झेंडा विक्री
नागपूर :मनसे कार्यकर्त्यांनी नागपूरमधील ॲमेझॉन कार्यालयात राडा केलाय. ॲमेझॉनच्या शॉपिंग साईटवरून पाकिस्तानचा झेंडा विक्री सुरू असल्याचं निदर्शनास येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ॲमेझॉन कार्यालयात तोडफोड केलीय. या प्रकरणी मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. मनसे कार्यकर्त्यांनी यापूर्वी ॲमेझॉनच्या व्यवस्थापकांना इशारा दिला होता. मात्र, त्यानंतर देखील ॲमेझॉनकडून पाकिस्तानच्या झेंड्याची विक्री थांबवण्यात आली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनच्या गणेशपेठ येथील कार्यालयाची तोफफोड केलीय. या प्रकरणी ॲमेझॉननं माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केलीय. पाकिस्तानचे झेंडे ऑर्डर करा, २४ तासांत आम्ही तुम्हाला घरपोच देवू, अशा पद्धतीची जाहिरात ॲमेझॉनवरून केली जात होती. मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर गणेशपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. (MNS activists vandalized Amazon office)