महाराष्ट्र

maharashtra

MLA Sanjay Gaikwad Threatened

ETV Bharat / videos

MLA Sanjay Gaikwad Threatened : 'गद्दार' संबोधल्यामुळे ठाकरे, शिंदे गट आमनेसामने; आमदार संजय गायकवाड यांची पदाधिकाऱ्याला धमकी

By

Published : Jun 22, 2023, 7:09 PM IST

बुलडाणा :बुलडाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच आपल्या रोखठोक भूमिकेमुळे चर्चेत असतात. त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही अनेकवेळा लक्ष्य केले आहे. मात्र, आता बुलडाण्यातील शिवसेना पदाधिकारी प्रा. सदानंद माळी यांना धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी माळी यांना धमकी देणारी ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहे.  यानंतर गद्दार म्हटले तर...:  तुम्ही तुमचे काम करा. तुम्हाला शिवसेनेत किती दिवस झाले. यानंतर गद्दार म्हटले तर घराबाहेर पडणे कठीण होईल अशी धमकी आमदार संजय गायकवाड यांनी प्रा.सदानंद माळी यांना फोनवर दिली आहे. याबाबत माळी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार केली आहे.  त्यामुळे राज्यात ठाकरे शिंदे गट आमनेसामने आल्याचे दिसुन येत आहे. या धमकी प्रकरणावर आमदार संजय गायकवाड काय स्पष्टीकरण देतात याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details