महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

MLA Sanjay Gaikwad, फोनवर बोलणारा शेतकरी नसून, तीनपट लोकांचे काम - आमदार संजय गायकवाड

By

Published : Jan 20, 2023, 4:10 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:39 PM IST

बुलढाणा :बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची बोदवड येथील शेतकऱ्याला शिवीगाळ, या आशयाची एक व्हायरल क्लिप होत असताना त्यांनी आज पत्रकारांना याबाबत बोलताना खुलासा करत सांगितले की, ती व्यक्ती शेतकरी होती की नाही हे सांगता येत नाही. पण जी भाषा तो बोलत होता त्याला उत्तर दिले आहे. बोदवड येथील उपसा सिंचन काम अंतिम टप्प्यात असून तो आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून त्याबद्दल लवकरच बैठक लावून ते पूर्णत्वास जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तब्बल अर्धा तास बोलल्यावर फक्त दोन मिनिटांची क्लिप का दाखवली जात आहे, हा एक प्रश्नच आहे. ही व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप ही माझीच असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याने त्याची क्रेडिट आमच्या सरकारला मिळू नये, म्हणून उपाय तीनपट हे शेतकऱ्याला पुढे करून स्वतः सरकारला बदनाम करण्याचे काम करत आहे. फक्त दोन मिनिटांची क्लिप का दाखवले जात आहे, असा संजय गायकवाड यांनी सवाल केला आहे.

नवा वाद : उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करा, असा फोन करणाऱ्यास बुलढाण्याच्या आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संभाषणाची एक क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. संजय गायकवाड यांनी ही क्लीप माझीच असल्याचे स्पष्ट केले आहे.

संजय गायकवाड वैतागले : एका शेतकऱ्याने संजय गायकवाड यांना फोन केला होता. यावेळी त्याने गायकवाड यांना बोदवड परिसर उपसा सिंचन योजना कधी पूर्ण होणार, असा सवाल विचारला होता. यावर संजय गायकवाड चांगलेच वैतागले. बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आहे. त्यासाठी मी केंद्र आणि राज्य सरकारकडून ११०० कोटींचा निधीही मंजूर करुन घेतला आहे. आता फक्त निविदा निघण्याची प्रक्रिया सुरु आहे, असा गायकवाड यांनी जवाब दिला.  

ऑडिओ क्लिप व्हायरल : तसेचया मार्च महिन्यात योजनेचे काम सुरुही होईल. त्यामुळे तुम्ही आता काहीतरी नौटंकी करुन राजकारण करु नका, असे गायकवाड यांनी त्या फोन करणाऱ्या शेतकऱ्याला सुनावले. यावर संबंधित नागरिकही आमदार गायकवाड यांच्याशी हुज्जत घालू लागला. त्यामुळे संजय गायकवाड यांच्या संतापाचा पारा आणखीनच चढला आणि त्यांनी या नागरिकाला शिवीगाळ केली. आमदार व संबंधित नागरिकांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 

Last Updated : Feb 3, 2023, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details