महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

DCM Devendra Fadvnis : माझ्या एका फोनवर आमदार बच्चू कडू गुवाहाटीला गेले - देवेंद्र फडवणीस - devendra fadnvis by one call

By

Published : Oct 31, 2022, 7:17 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये वाद सुरू आहे. आमदार बच्चू कडू ( MLA Bachu Kadu ) यांनी गुवाहाटीला जाऊन शिंदे-फडवणीस सरकार सोबत पाठिंबा असल्याचे दाखवले. याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंवर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचा आरोप केला होता. यामुळे दोघांमध्ये चांगलाच वाद पेटला होता. या दोघांच्या वादामध्ये आता राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( Deputy Chief Minister Devendra Fadwanis ) यांनी आज पत्रकार परिषदेत यांसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. आमदार बच्चू कडू हे माझ्या एका कॉलवर गुवाहाटीला गेले होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. म्हणून त्यांच्यावर आरोप करणे आता थांबवले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details