Minister Uday Samant : मला काही माहितच नाही - उदय सामंत - एकनाथ शिंदे
मुंबई - महाराष्ट्रात झालेल्या राज्यसभा आणि विधानसभेच्या निवडणूक निकालात महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी नाट्याचे पडसाद पहायला मिळाले. महात्वकांक्षी भाजपने राज्यसभेत आणि विधानसभेतही मतांची जुळवणी करत आपल्या पारड्यात यश पाडुन घेतले आणि संशयकल्लोळ तयार झाला. काय झाले आहे हे समजण्या आधिच राज्यात मोठा भूकंप झाला. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना, अपक्ष असे सगळे मिळून 25 आमदारांच्या गटाला घेऊन सुरत गाठले. सध्या त्यांच्या सोबत असलेले सगळे आमदार नाॅट रिचेबल आहेत. याबाबत मंत्री उदय सामंत यांना विचारले असता मला याबाबत काहीच माहिती नाही. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या निवसस्थानावर बैठक बोलावली असून त्या ठिकाणी जायचे आहे, असे म्हणत त्यांनी बोलणे टाळले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST