VIDEO : मागचे शंभर नव्हे तर पुढील 25 वर्षाचे नियोजन करत आहोत; आदित्य ठाकरेंचा परभणीत विरोधकांना टोला - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
परभणी - शंभर वर्षांपूर्वी काय झालं यावरुन भांडायला सर्व पक्षांना वेळ आहे. पण आम्ही पुढच्या पंचवीस वर्षात काय करायचं यावर काम करत आहोत, असा टोला आज परभणीत युवा सेनेचे प्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच आयोध्येत येण्यास कोणाला कोण अडवत आहे, यात मला जायचं नाही. न्यायालयाच्या निकालाने राम मंदिराचे काम सुरू झालेले आहे. आम्ही आता श्रीरामाच्या दर्शनासाठी जात आहोत, असेही ठाकरे म्हणाले. परभणी शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ सायन्स पार्कच्य भूमिपूजन कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आलेले आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परभणीचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार संजय जाधव, खासदार हेमंत पाटील, आमदार डॉ. राहुल पाटील यांची उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST