Video : भटक्या लोकांना एमआयएमने दिला मदतीचा हात; ईदनिमित्त भेटवस्तू - सोलापूर मशिदी
सोलापूर - शहरातील विविध दर्गा, मंदीर, मशिदीसमोर भीक मागून खाणाऱ्या नागरिकांना एमआयएमने मदतीचा हात दिला. रस्त्यावर मळकट कपडे घालून फिरणाऱ्या भटक्यांना एमआयएम कार्यालयासमोर आणून त्यांना आंघोळ घातली. त्यांची कटिंग केली आणि अनेक भेटवस्तू देत नवीन कपडे देऊन ईद आनंदाने साजरी केली. यासाठी एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दी यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. हे कार्य सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी भटक्या नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसून आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST