Fire at an orphanage पुणे कॅम्प भागात मध्यरात्री आग; 100 मुलांची सुखरुप सुटका - East Street Camp Tayyabia Childrens Orphanage
मध्यरात्री ईस्ट स्ट्रीट कॅम्प तय्यबीया मुलांचे अनाथ आश्रम पुणे Midnight fire at an orphanage येथे आग fire at an orphanage लागल्याची घडली असून अग्निशमन दल नियंत्रण कक्षात माहिती मिळताच दलाकडून मुख्यालयातील एक अग्निशमन वाहन व देवदूत वाहन तसेच पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन वाहन ही घटनास्थळी रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी तय्यबीया अनाथ मुलांचे आश्रम या चार मजली इमारतीत तळमजल्यावर आग लागल्याचे पाहून मोठ्या प्रमाणात धुर झाल्याचे निदर्शनास येताच जवानांनी तातडीने इमारतीत असणाऱ्या जवळपास १०० मुलांना वय ०६ ते १६ वर्षे आग व धूर यापासून सुरक्षित ठिकाणी सुखरुपपणे हलवून मोठा धोका दूर hundread childern safely released केला. या कामगिरीत पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, वाहन चालक अतुल मोहिते, तांडेल चंद्रकांत गावडे व जवान आझीम शेख, गौरव कांबळे तर पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन दलाचे तांडेल आसिफ शेख, वाहनचालक ओंकार ससाणे व जवान प्रमोद चव्हाण, कुंडलित गायकवाड, सचिन भगत, निखिल जगताप, पंकज रसाळ यांनी सहभाग घेतला. East Street Camp Tayyabia Childrens Orphanage
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST