महाराष्ट्र

maharashtra

बुलडाणा बस अपघात

ETV Bharat / videos

Buldana Bus Accident: अपघातातील सर्व मृतकांवर उद्या बुलडाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार - मृतकांवर उद्या बुलडाण्यात सामूहिक अंत्यसंस्कार

By

Published : Jul 1, 2023, 7:19 PM IST

बुलडाणा:येथील सिंदखेड राजा जवळ समृद्धी महामार्गावर आज भीषण अपघात झाला. त्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर सर्वांत मोठे आवाहन मृतदेहांची ओळख पटवणे (identification of dead bodies) होते. त्याकरिता यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि फॉरेन्सिक टीम 'डीएनए' चाचणी करण्याकरिता प्रयत्न सुरू झाले; (Mass funeral for all dead) पण तरी 24 तास टीमने काम केले तरी मृतांची ओळख पटवण्यासाठी चार ते पाच दिवस लागू शकतात, असे सर्व नातेवाईकांसमोर ग्रामविकासमंत्री मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. (Buldana Bus Accident)

नातेवाईकांनी या आपल्या मृत्यूमुखी पडलेल्यांवर उद्या सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान बुलडाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचे एकमत केल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना सांगितले. 25 पैकी 20 ते 21 नातेवाईक बुलडाण्यात पोहोचले असून चार जण प्रवास करीत आहेत. तेही लवकर एक ते दोन तासात बुलडाण्यात पोहोचतील व याच निर्णयावर एकमत होईल असेही गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले. तर एकंदरीत या शोकाकुल घटनेवर आता सामूहिक अंत्यसंस्कारद्वारे उद्या या मृतकांवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली. 

ABOUT THE AUTHOR

...view details