Ganeshotsav 2022 नवसाला पावणारा सत्यगणपती आहे नांदेडकरांचे श्रद्धास्थान, लाखो भाविक घेतात दर्शन - गणेश चतुर्थी
नांदेड - नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर नांदेड शहरापासून दहा किमी अंतरावर असलेला सत्यगणपती हे मराठवाड्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले Marathwadas famous Ganesha Temple Satya Ganapati जाते. सत्यगणपती हा नवसाला पावणारा गणपती अशी गणेशभक्तांची श्रद्धा nandedkar takes vows आहे. देवस्थान नावारूपाला येण्यापूर्वी एका छोट्या पारावर होते. पिंपळाच्या झाडाखाली पार असून, या पारावर कमानीचे छोटेखानी मंदिर, असे सुरुवातीचे स्वरूप होते. पूर्वी वाहतूकीची साधने उपलब्ध नसल्याने या मार्गावरून येणारे-जाणारे नागरिक सत्यगणपतीचे दर्शन घेऊन पुढे जात. परिसरातील गावांमधील गणेशभक्तांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. १९९४ मध्ये गणेश जयंतीला मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. तेथून पुढे हे मंदिर नावारूपास आले. वर्षाकाठी लाखो भाविक सत्यगणपतीचे दर्शन घेतात. गणेश जयंती, अंगारिका, संकष्टी चतुर्थीला गणेशभक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी होते. वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST