Manoj Jarange Patil Sabha Video : 'मराठा समाजाच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार; इंचभर मागं हटणार नाही' - Kunbi certificate
Published : Oct 20, 2023, 8:31 PM IST
पुणे : Manoj Jarange Patil Sabha Video : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे करत आहेत. जरांगे पाटील यांची शुक्रवारी पुण्यातील राजगुरुनगर येथे सभा झाली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. सरकारनं आपलेच लोकं आपल्या अंगावर सोडलेत. यामुळं आता थंड डोक्यानं काम करावे लागेल. अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही. हे मराठ्यांचं शांततेचं युद्ध आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
बलिदान मराठा समाज वाया जाऊ देणार नाही : मराठा समाजाच्या भावाने आरक्षणासाठी गुरुवारी आत्महत्या केली. मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुनील कावळे आत्महत्येचे बलिदान मराठा समाज वाया जाऊ देणार नाही. मराठा समाज कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही, अशी ग्वाही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.
आंदोलन शांततेत सुरू : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांचे आंदोलन शांततेत सुरू आहे. एकेकाळी दार ठोठावल्याशिवाय मागण्या पूर्ण होत नाहीत, अशी मराठा समाजाची भावना होती, मात्र, आता शांततेत आरक्षण मिळेल, असा शब्द आहे. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय समाज एक इंचही मागे हटणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.