Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांनी घेतलं जमीनीत गाडून - मनोज जरांगे
Published : Sep 8, 2023, 5:25 PM IST
बीडReservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील महिला आक्रमक झाल्याचं दिसतंय. बीड तालुक्यातील वासनवाडी गावातील चार महिलांनी जमिनीत गाडून या राज्य सरकारचा निषेध केलाय. शिंदे सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, कोणतेही निकष न लावता आम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी या महिलांनी केलीय. यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. या आंदोलनाचं वृत्त प्रशासनापर्यंत पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला. आंदोलकांची भेट घेण्यासाठी प्रशासनातील अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. वंशावळीच्या नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. सरकारनं घेतलेला निर्णय चांगला आहे. पण मराठा वंशावळीऐवजी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलीय. मनोज जरांगे गेल्या 11 दिवसांपासून मराठा समाजासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळाला आहे.