चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल; म्हशीवर बसून म्हणते चालली मुंबईला, मराठा आरक्षण येणार घेऊन - चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल
Published : Jan 6, 2024, 9:30 AM IST
|Updated : Jan 6, 2024, 10:12 AM IST
नांदेड Maratha Reservation : सध्या समाज माध्यमांवर एका चिमुकलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक 4 वर्षांची मुलगी म्हशीवर बसलेली दिसत आहे. तसंच 'मी जरांगे पाटलांसोबत मुंबईला जाणार' असल्याचं ती या व्हिडिओमध्ये सांगत आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील आंबेसांगवी या गावामधील हा व्हिडिओ आहे. सर्वज्ञा हुस्सेकर असं या मुलीचं नाव असून व्हिडिओमध्ये म्हशीवर बसूनच जाणार, असा प्रश्न तिला एक व्यक्ती विचारतो. तेव्हा आमच्या पप्पाचं ट्रॅक्टर देवेंद्र फडणवीस घेऊन येऊ देत नाहीत, असं उत्तर ही मुलगी देते. तसंच आरक्षण घेतल्याशिवाय आता यायचं नाही, असं सांगत ती 'एक मराठा कोटी मराठा' अशी घोषणा या व्हिडिओत देत आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या कंधार पोलिसांनी ट्रॅक्टर चालकांना कलम 149 नुसार नोटिसा दिल्या आहेत. तसंच मराठा नेते किंवा आंदोलक ट्रॅक्टरसाठी आले तर देऊ नका, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.