Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाची हवा काढून घेण्यासाठी सरकारची संभाजी भिडेंना सुपारी; ठाकरे गटाची टीका - शरद कोळी
Published : Sep 12, 2023, 3:35 PM IST
सोलापूर Maratha Reservation :शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे आज जालन्यातील अंतरवली सराटी येथे गेले होते. मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची संभाजी भिडेंनी भेट घेतलीय. यावरुन ठाकरे गटाचे युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी संभाजी भिडेंवर घणाघाती टीका करत सरकारवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी संभाजी भिडेंना सुपारी दिलीय का? असा सवाल शरद कोळी यांनी उपस्थित केलाय. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पंधरा दिवस झालेत. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील अन्नत्याग करत आंदोलन अधिक तीव्र केलंय. त्यांच्या आंदोलनाची हवा काढुन घेण्यासाठी किंवा पंक्चर करण्यासाठी संभाजी भिडेंना अंतरवली सराटी येथे पाठवलं असल्याची टीकाही शरद कोळींनी केलीय.
संभाजी भिडेंना आत्ताच पुळका आला -मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालन्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र आतापर्यंत संभाजी भिडे तिकडे फिरकले नव्हते. आत्ताच संभाजी भिडेंना मनोज जरांगे पाटीलां यांचा पुळका कसा काय आला? असा सवाल युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा :
- Maratha Protest: आरक्षणासंदर्भात मराठा समाज आक्रमक; छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको, तर १७ सप्टेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास...
- Maratha Reservation : संभाजी भिडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; उपोषण मागं घेण्याची विनंती
- Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षणच हाच माझ्या प्रकृतीवर एकमेव उपाय, आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार- मनोज जरांगे पाटील