Maratha Reservation : कराड शहरात भगवे वादळ; जरांगे-पाटलांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांचा विराट मोर्चा, पाहा व्हिडिओ - मराठा बांधवांचा विराट मोर्चा
Published : Oct 30, 2023, 10:10 PM IST
सातारा Maratha Reservation:संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र झाला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांना राज्यभरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. आरक्षाणाची मागणी आणि जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ साताऱ्यातील कराड शहरात सोमवारी हजारो मराठा बांधव आणि भगिनींनी विराट मोर्चा (Sakal Maratha Samaj For Support Jarange Patil) काढला. एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणा देत कराड शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चात 'मराठ्यांचा अंत पाहू नका, पहिले आरक्षण, नंतर इलेक्शन, मनोज जरांगे तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत', अशी लक्षवेधी पोस्टर्स मराठा तरूणांनी झळकवली. मोर्चात सामील होत मराठा आरक्षणाला कराड बार असोसिएशनने पाठिंबा जाहीर केला. मराठा दिव्यांग बांधव तसेच एक वृद्ध महिला देखील हिरीरीने मोर्चात सहभागी झाली होती. डोक्यावर भगवी टोपी आणि हातातील भगव्या ध्वजामुळे कराड शहरात भगवे वादळ अवतरले होते.