Maratha Reservation : सरकारला आरक्षण द्यावे लागणार नाहीतर...; चंद्रकांत खैरेंचा इशारा - देविदास पाठे
Published : Sep 10, 2023, 1:25 PM IST
छत्रपती संभाजीनगर (गंगापूर) : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जालन्यातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या घटनेच्या निषेधार्थ कायगाव येथील मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या स्मृती स्थळाजवळ देविदास पाठे हे सात दिवसापासून आमरण उपोषणाला (Hunger Strike) बसले आहेत.
सरकारला आरक्षण द्यावे लागणार : उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालली असून, त्यांच्यावर उपोषणस्थळीच उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उपोषणाच्या सातव्या दिवशी उपोषणस्थळी देविदास पाठे यांची भेट घेत विचारपूस केली. सरकार मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्याने, मराठा समाजाचा रोष वाढत आहे. आंदोलनाची सरकार गांभीर्याने दखल घेत नसून हे आंदोलन मराठा समाजाच्या न्याय मागणीसाठी आहे. सरकारला आरक्षण द्यावे लागणार नाहीतर जावे लागणार, अशी प्रतिक्रिया माजी खासदार व ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire Reaction) यांनी दिली आहे.