महाराष्ट्र

maharashtra

मंत्री उदय सामंत

ETV Bharat / videos

Uday Samant : काही ठिकाणी मराठा आरक्षणाचा उद्रेक होणे स्वाभाविक - मंत्री उदय सामंत - मराठा आरक्षणाचा उद्रेक

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 8:48 PM IST

पुणे Uday Samant On Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. (Minister Uday Samant) त्याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच बारामती मतदारसंघात सहन करावा लागला. यामुळं त्यांना कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. (Uday Samant Pune PC) यावर आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाचा प्रश्न थोडा चिघळला आहे. संवादातून मार्ग निघत असतो. काही ठिकाणी उद्रेक होणे स्वभाविक आहे. त्यातूनच अजित पवारांची घटना घडली आहे, असे ते म्हणाले. (Maratha Reservation Issue)

संवाद साधण्याचा सल्ला : मराठा आंदोलनाचा मागचा इतिहाससुद्धा तपासून घेतला पाहिजे. आमचं सरकार हे मराठा आरक्षण देण्याच्या बाजूनं आहे. फक्त ते टिकणारं आरक्षण राहावं त्यासाठी संवाद होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. जरांगे पाटील यांनी संवाद ठेवला पाहिजे. संवाद केला तरच प्रश्न सुटत असतो, असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी एकप्रकारे मनोज जरांगे यांना संवाद साधण्याचा सल्ला दिला. उदय सामंतांनी मागच्या सरकारवरसुद्धा टीका केली. मागच्या वेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना मराठा समाज कधीही मानत नाही. त्यांना अध्यक्ष केलं आणि त्यांनी काहीही केलं नाही. हे त्यांचं पाप असल्याची टीका त्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details