Maratha Reservation : विजय वडेट्टीवार म्हणजे ओबीसी समाज नाही; आरक्षण मुद्द्यावरून ओबीसी आक्रमक - Maratha Reservation
Published : Sep 5, 2023, 10:30 AM IST
पुणे : Maratha Reservation : मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. जालना येथे मराठा आरक्षणासाठी बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज (Maratha Reservation Protest) झाला होता. त्यानंतर राज्यभर मराठा समाज आक्रमक होत आंदोलन करत आहे. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सोमवारी आंदोलकांसोबत चर्चा केली. ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला (OBC Samaj) ओबीसींमधून आरक्षण देण्याची वडेट्टीवारांनी मागणी केली आहे. तसेच यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी देखील राज्यपालांकडे करणार असल्याचं यावेळी वडेट्टीवारांनी सांगितलं. त्यांच्या या विधानानंतर आता ओबीसी प्रतिनिधी हे आक्रमक झाले असून, त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला आहे. (OBC Samaj On Vijay Wadettiwar Statement)