महाराष्ट्र

maharashtra

Maratha protesters

ETV Bharat / videos

चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे - Maratha Reservation

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 10:32 PM IST

लातूरMaratha Reservation :भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आज लातूरमध्ये मराठा तरुणांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजाच्या तरुणांनी बावनकुळे यांना काळे झेंडे दाखवत निदर्शनं केली. लातूरमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा समाज आंदोलन करत असून आज लातूरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केलीय. "आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं " अशा घोषणा मराठा आदोलकांनी देत सरकारचा निषेध व्यक्त केला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचं नियोजन केलं होतं. मात्र मराठा आंदोलन आक्रमक झाल्याचं पाहून चंद्रशेखर बावनकुळे तत्काळ अहमदपूरच्या दिशेनं रवाना झाले. 

ABOUT THE AUTHOR

...view details