Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक; धाराशिवमध्ये शिंदे समितीची गाडी अडवली; पहा व्हिडिओ - protesters block Shinde committee car
Published : Oct 28, 2023, 10:10 AM IST
धाराशिव Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात अहवाल तयार करणाऱ्या शिंदे समितीच्या ताफ्याला शुक्रवारी धाराशिव येथील मराठा आंदोलकांनी अडवलं. तसंच यावेळी त्यांचा निषेध करत शिंदे समिती गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मराठा तरुणांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. दरम्यान, न्यायमूर्ती शिंदे समिती शुक्रवारी धाराशिव दौऱ्यावर होती. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्यासाठी अहवाल तयार करायचा आहे. हा अहवाल तयार करणाऱ्या शिंदे समितीला राज्य सरकारकडून 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी काल मराठा तरुण रस्त्यावर उतरले होते. यावेळी मराठा तरुणांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. दरम्यान, याआधी शिंदे समितीला अहवाल देण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र तेलंगणामध्ये सध्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळं तेलंगणामधून मूळ कागदपत्र मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळं सरकारकडून शिंदे समितीला ही मुदतवाढ देण्यात आली आहे.