महाराष्ट्र

maharashtra

जरांगे पाटलांची पत्नी

ETV Bharat / videos

Maratha Reservation : मायबाप सरकारनं अंत पाहू नये.. जरांगे पाटील यांच्या पत्नीची प्रतिक्रिया - Manoj Jarange Patil health deteriorated

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 9:32 PM IST

Updated : Sep 6, 2023, 9:39 PM IST

जालना :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सलाईनद्वारे पाणी, इतर औषधे देण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीशी बोलन्याचा प्रयत्न केला आसता त्या भावनीक झाल्या. त्यांच्या पत्नीनं सांगितले की, "मी डोळ्यात अश्रू दाखवून उपोषण मागे घेण्यास त्यांना सांगणार नाही. मला आता त्यांच्याकडं बघवत नसल्याचं देखील त्या म्हणाल्या. आम्ही कितीही काळजी केली तरी, ते आपल्या निर्धारापासून मागे हटणार नाहीत. त्यांची तब्येत बिघडत असल्याची बातमी मी टीव्हीवर पाहिली. माझी मायबाप सरकारला एकच विनंती की, त्यांचा अंत पाहू नका.  लवकरात लवकर आरक्षणाचा निर्णय घ्या, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांच्या पत्नीन दिलीय. 

Last Updated : Sep 6, 2023, 9:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details