महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Maratha Reservation : घर जाळण्याचा प्रकार इंग्रजांच्या काळात देखील झाला नव्हता - जयदत्त क्षीरसागर - मराठा आरक्षण

🎬 Watch Now: Feature Video

Maratha Reservation

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 4:54 PM IST

Updated : Nov 3, 2023, 6:17 PM IST

बीड Maratha Reservation:माझ्या घरावर झालेला हल्ला हा धक्कादायक प्रकार इंग्रजांच्या काळात देखील झालेला नव्हता, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे. ते आज बीडमध्ये बोलत होते. सोमवारी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची घरं जाळण्यात आली होती. त्यानंतर बीडमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. या पार्श्वभूमीवर बीडसह धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसंच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. सोमवारी बीडमध्ये घडलेल्या घटनेचं समर्थन करता येणार नाही. मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. आजही त्याबाबत काही निर्णय घेण्यात आले आहेत. पण काही लोक हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.

Last Updated : Nov 3, 2023, 6:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details