Maratha Reservation : ठाण्यात सुनील तटकरेंना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे - सुनील तटकरे
Published : Oct 29, 2023, 9:44 PM IST
ठाणे Maratha Reservation : ठाण्यात मराठा आरक्षणासाठी अत्यंत शांततापूर्ण मोर्चे काढणारा मराठा समाज आता चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे. मराठा आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण (Hunger Strike) सुरु केल्याने मराठा आरक्षण आंदोलनाला चांगलीच धार आली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे ठाण्यात आले होते. त्यांचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांना काळे झेंडे दखवण्यात आले. 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.