महाराष्ट्र

maharashtra

Maratha Reservation

ETV Bharat / videos

Maratha Reservation : राजकीय नेत्यांना गाव बंदीचं बॅनर फाडलं, कार्यकर्त्यांना केली मारहाण

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 9:42 PM IST

जालनाMaratha Reservation :भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर येथील ग्रामस्थांनी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बॅनर लावून मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व नेते, आमदारांना गावात येण्यास बंदी घातली होती. मात्र, हे बॅनर रात्री काही समाजकंटकांनी फाडून टाकलं. या समाजकंटकांना बॅनर फाडल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठा तरुणांना जबर मारहाण करण्यात आली आहे. जाब विचारणाऱ्यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळं काही गावात तणावाचं वातावरण होतं. मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी करण्याच्या सूचना मनोज जरांगे यांनी दिल्या होत्या. त्यांनी उपोषण मागं घेताना गावबंदी मागं घेण्यास सांगितलं होतं. परंतु, काही गावांमध्ये राजकीय नेत्यांची गावबंदी होती. राज्य सरकारशी झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details