Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी 'विश्वगुरु'नं...; अंबादास दानवेंचं आशिष शेलारांना प्रत्युत्तर - Uddhav Thackeray
Published : Sep 7, 2023, 10:02 AM IST
पुणे : Maratha Reservation : जालना येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मराठा आरक्षणावरील झालेल्या लाठीचार्जनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली. दोन वर्ष आरक्षण घेवून घरी बसणारे 'महामाही' उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे माफी केव्हा मागणार? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी विचारला होता. त्याला आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं (Ambadas Danve Reaction) आहे. मराठा आरक्षणावर वटहुकूम काढा, आमची सत्ता अडीच वर्षासाठी होती. तुमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे. तुमच्याकडे विश्वगुरू आहेत. ज्या गुरुंचे संपूर्ण विश्व मार्गदर्शन घेत असतात त्याच गुरुने आता वटहुकूम काढावा, तसेच आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्याची तयारी करावी आणि मराठा समाजाला आरक्षण (Maratha Aarakshan) द्यावे, (Ambadas Danve Reaction On Bjp Ashish Shelar) असे अंबादास दानवे म्हणाले.