Maratha Protest Beed : बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक, नगरपरिषदेची इमारत पेटवली
Published : Oct 30, 2023, 3:37 PM IST
बीड(Maratha Protest Beed) :मराठा आरक्षण आंदोलनानं राज्यात पेट घेतलाय. सोमवारी (३० ऑक्टोबर) सकाळी आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांची गाडी आणि बंगला पेटवला होता. आता आंदोलकांनी माजलगाव नगरपरिषदेची इमारत पेटवून दिली. सकाळी हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक माजलगाव नगरपरिषदेबाहेर जमा झाले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत इमारतीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी इमारतीमधील साहित्य पेटवून दिलं. या घटनेनंतर माजलगाव शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मराठा आंदोलक लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी सकाळी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेकही करण्यात आली. याशिवाय सोळंकेंच्या घराबाहेर असलेल्या गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. पाहा हा व्हिडिओ..