मनोज जरांगे यांचं बीडमध्ये जंगी स्वागत, 201 जेसीबीमधून फुलांची उधळण
Published : Dec 23, 2023, 3:47 PM IST
बीड : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारेमनोज जरांगे पाटील यांचं बीडमध्ये जंगी स्वागत झालं. त्यांच्यावर तब्बल 201 जेसीबीमधून कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीदेखील केली. जरांगे यांच्या रॅलीदरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बॉम्बशोधक पथक तैनात करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबरला संपत आहे. जरांगे यांनी आम्हाला ओबीसीमधून मराठा आरक्षण द्या, अन्यथा राज्यभरात पुन्हा आंदोलन छेडू, असा इशारा दिला होता. तर दुसरीकडं मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.