Manipur Violence : अधिक सैन्य पाठवून प्रश्न सुटणार नाही, इरोम शर्मिला यांचा ईटीव्हीशी खास संवाद - इरोम शर्मिला यांचा ईटीव्हीशी खास संवाद
इंफाळ (मनिपुर) : राज्यात अधिक फौज पाठवून मणिपूरमधील हिंसाचार सुटणार नाही. मणिपूरच्या आयर्न लेडी आणि नागरी हक्क कार्यकर्त्या इरोम शर्मिला चानू यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी हे विधान केले आहे. प्रणव कुमार दास यांच्याशी त्यांनी संवाद साधला आहे. त्यांनी यावेळी मणिपूरमधील जटिल लोकसंख्या आणि वांशिक समस्यांवर चर्चा केली. मणिपूर हिंसाचारात 54 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मणिपूरमध्ये भडकलेल्या हिंसाचाराबद्दल, नागरी हक्क कार्यकर्त्या इरोम चानू शर्मिला यांनी म्हटले आहे की राज्यात अधिक सैन्य पाठवून प्रश्न सुटणार नाही. या संदर्भात ईटीव्ही भारतशी त्यांनी संवाद साधला. मणिपूर राज्य एक जटिल लोकसंख्याशास्त्रीय आणि वांशिक समस्येने ग्रस्त आहे आणि ते (1947)पासून सुरू आहे. शर्मिला म्हणाल्या, की हा मुद्दा जमीन सुधारणा कायद्यापासून सुरू झाला आणि त्यामुळे हिंसाचार आणि लोकांना त्रास झाला असही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.