महाराष्ट्र

maharashtra

तरुणांची धावत्या रेल्वेवर उडी

ETV Bharat / videos

Nashik News: मनमाड रेल्‍वेस्‍थानकावरील थरारक घटना; तरुणांची धावत्या रेल्वेवर उडी, व्हिडीओ व्हायरल - Manmad Railway Station

By

Published : Apr 17, 2023, 7:44 AM IST

नाशिक ( मनमाड ) :मनमाड रेल्वे स्थानकावर एक तरुणांने प्लॅटफॉर्मवर चढून धावत्या गाडीवर उडी घेतली. यात तो तरूण ओव्हरहेड वायरला चिटकल्याने  मोठा स्फोट होऊन तो फेकला गेला. यात तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, मनमाड रेल्वे स्थानकावर एक तरुण झाडावर चढून प्लॅटफॉर्मवर असलेल्या पत्र्याच्या शेडवर चढला. जवळपास दीड तास हा वर उभा राहून बडबड करत होता. कोणी त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला की, तो उडी मारण्याची धमकी देत होता. शेवटी त्याने बंगळूरवरून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसवर उडी मारली. यात तो ओव्हरहेड वायरला लटकला यात त्याला मोठा शॉक लागला.  याबाबत रेल्वेच्या अधिकारी यांनी सांगितले की, तो मानसिक रुग्ण आहे, पुढील तपास आरपीएफ करत आहेत. तसेच मनमाड हे रेल्वेच्या दृष्टीने मोठे जंक्शन असून, उत्तर भारताचे प्रवेशद्वार म्हणुन ओळखले जाते. या ठिकाणी दिवसभर शेकडो रेल्वेच्या माध्यमातून हजारो प्रवासी ये जा करतात.  मनोरुग्णांची  संख्या रेल्वेच्या परिसरात वाढत आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details