Ashram School Principal Suspension: क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना एकाच वाहनात कोंबले; विजयकुमार गावितांनी मुख्याध्यापकाचे केले निलंबन - Ashram School Principal Suspension
नंदुरबार : गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा मजितपूर येथील आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी (Tribal Student Sports Competition) एका वाहनात कोंबून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यातील काही मुले प्रवासा दरम्यान बेशुद्ध देखील झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांनी (Tribal Development Minister Dr Vijaykumar Gavit) नाराजी व्यक्त करत या शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्याचे आदेश (Nandurbar Principal Suspension Order) दिले आहे. ज्या पद्धतीने मजीदपूर येथील आश्रम शाळेतील मुख्याध्यापक ( Majidpur Ashram School Principal Suspension) आणि विद्यार्थ्यांची अवहेलना केली हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची अशाप्रकारे एक प्रकारे पिळवणूक असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने घेऊन जाणे चुकीचे असून अशा प्रकार पुन्हा खपवून घेतला जाणार नसल्याचे संकेत देण्यात आले आहे. या प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावितांनी दिले आहे. (Student Unconscious During Travel)
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST