Mahesh Landge On Bullock cart Race: बैलगाडा शर्यत महाराष्ट्राची अस्मिता आणि परंपरा - महेश लांडगे - अस्मिता आणि परंपरा
पुणे: बैलगाडा मालक व शर्यत प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने बैलगाडा प्रेमींना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला परवानगी दिली आहे. तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकारच्या कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज निकाल दिला आहे. या याचिकांमध्ये तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकारने 'जल्लीकट्टू' आणि बैलगाडी शर्यतींना परवानगी देण्यासाठी केलेल्या कायद्याला आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती केएम जोसेफ, अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषिकेश रॉय आणि सीटी रविकुमार यांचे पाच न्यायाधीशांचे घटनापीठाने निकाल दिला आहे. यावर पहिल्यापासून न्यायलायीन लढाईत अग्रेसर असणारे भोसरी मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले की, आजचा निर्णय हा आमच्यासाठी तसेच शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तसेच या निर्णयानंतर आता बैलगाडा मालक यांची जबाबदारी ही वाढली आहे. आज जे कोणी याच श्रेय घेत असतील त्यांना घेऊ द्या पण, आम्ही याकडे आता पर्यंत परंपरा म्हणूनच बघितल आहे. असे देखील यावेळी लांडगे म्हणाले.