महाराष्ट्र

maharashtra

Hivre Bazar

ETV Bharat / videos

Hivre Bazar : आदर्श गाव हिवरे बाजार येथे सुवर्णमहोत्सवी महाश्रमदानाचे आयोजन; पाहा व्हिडिओ

By

Published : May 12, 2023, 8:54 PM IST

Updated : May 12, 2023, 9:41 PM IST

अहमदनगर :आदर्श गाव हिवरे बाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णमहोत्सवी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. हिवरे बाजार येथील ५१ वर्षापूर्वी सन १९७२ च्या दुष्काळात तयार केलेल्या पाझर तलावाचे काम झाले होते. तसेच आजचे श्रमदान पाहून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले की, तीन पिढ्या श्रमदान करताना पाहून आनंद वाटला. श्रमदानात ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळ विद्यार्थी तसेच महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. हिवरे बाजार येथील श्रमदानाचे इतर गावांनी अवलोकन केले तर इतरही गावे पाणीदार स्वावलंबी होण्यास वेळ लागणार नाही असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. श्रमदानासारख्या उपक्र्मातून गावागावात एकोपा निर्माण होऊन विविध विकास कामे गुणवत्तादायी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होते. महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवारमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार येथे विविध प्रकारची जलसंधारणाची कामे करण्यात येत आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांनी बोलताना सांगितले की गावकऱ्यांना दुष्काळात जगविण्यासाठी पाझर तलावाचे काम करण्यात आले. लोकांना जगविणे एवढेच ध्येय असल्यामुळे जलसंधारणच्या दृष्टीने पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रम राबवण्यात आला. 

Last Updated : May 12, 2023, 9:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details