राज्यात डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी वाढणार - डॉ. अनुपम कश्यपी - राज्यातील हवामानाचा अंदाज
Published : Nov 17, 2023, 9:35 AM IST
पुणेWinter In Maharashtra : सध्या राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह इतर शहरांमध्ये थंडीचा कडाका सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी सकाळ-संध्याकाळ थंडीची सुरवात झाली आहे. मात्र, डिसेंबरमध्ये थंडीची सरुवात होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. सध्या मध्य महाराष्ट्रातील पुण्यात 14.4 तापमानाची नोंद झाली आहे, तर अहमदनगरमध्ये 14.5 इतका तापमानाचा नीचांक नोंदवला आहे. डहाणू येथे 21.0, मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे 13.4, विदर्भातील यवतमाळात 15.0 इतके नीचांकी तापमान नोंदण्यात आलं आहे. पुढील आठवड्यातही हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी येणाऱ्या आठवडाभरात हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. येणाऱ्या काळात राज्यात तापमान आणखी कमी होणारर असल्याचं त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलंय.